¡Sorpréndeme!

जीवाशी खेळ | हिंगोलीतल्या सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण विभागातील जेवणात अळ्या सापडल्या

2021-07-31 1,503 Dailymotion

हिंगोलीतल्या(Hingoli) जिल्हा सामान्य रुग्णालयातील किळसवाणा प्रकार समोर आला आहे. इथल्या बाल रुग्ण विभागातील जेवणात अळ्या सापडल्या आहेत. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. बालरुग्ण विभागातील हा धक्कादायक प्रकार आहे. जिल्हाभरातून गोरगरीब मुलांना उपाचारासाठी इथं आणलं जातं. मात्र त्यांना अळ्या असलेलं घाणेरडं जेवण देऊन त्यांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरूय असंच म्हणता येईल.. याबाबत नातेवाईकांनी रुग्णालया प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जेवण पुरवणाऱ्याचं कंत्राट तात्काळ रद्द करण्यात आलं. मात्र तक्रार करेपर्यंत रुग्णालय प्रशासन झोपलं होतं का असाच सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय
#hingoli #hingolinews #hingolihospital #hingolinewsupdate